मंत्री महाजन साहेब मराठ्यांच्या वाटेला जावू नका : मनोज जरांगेंचा इशारा
Minister Mahajan Saheb Do not follow the path of Marathas : Manoj Jarange’s warning जामनेर : मंत्री गिरीश महाजन यांनी सरसकट आरक्षण देता येणार नाही, असे वक्तव्य रविवारी केल्यानंतर जामनेर येथे आलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी गिरीश महाजनांवर टिकेचे बाण चालवले. ते म्हणाले की, ’महाजन साहेब, आम्ही तुमचा आदर करतो. आरक्षणाबाबत आमचं सरकारशी ठरलं आहे. तुम्हाला सर्व माहिती आहे. माहित नाही असं म्हणू नका, उगाच नाटक कंपनीच्या नादी लागू नका,अन्यथा तुम्हाला जड जाईल,’ असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
आमच्या हक्काचे आरक्षण घेणार
जरांगे म्हणाले की, आरक्षणासाठी आमच्या मुलांचे बळी पडत आहेत. आम्ही कुणाच्याही आरक्षणावर हक्क दाखवत नसून आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत. मला राजकारण करायचे नाही. आंदोलन सुरू केल्यापासून राज्यात लाख नोंदी सापडल्या आहेत.


काही मंत्री आमच्याविरुद्ध गैरसमजपसरवून इतर समाजबांधवांची दिशाभूल करीत आहेत. मंत्री भुजबळ अंबडला येऊन मी पाचवी शिकलो नसल्याचे संबोधून माझ्या वाटेला गेले. माझे शिक्षण शोधण्यासाठी सरकारने तीन दिवस घालवले. तुमच्या म्हणण्यानुसार पाचवी शिकलो असलो तरी मराठ्यांचा आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणले. तुम्ही मात्र हुशार असून जेलमध्ये बेसन-भाकर खायला गेला होता, असा टोलाही जरांगे पाटील यांनी भुजबळांना लगावला. जामनेर येथे जरांगेंच्या सभेला मराठा समाजबांधवांची मोठी गर्दी झाली होती.





