म्हैसवाडीतील खेळाडू गुजरातच्या दोडे गुर्जर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत चमकला


यावल : यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथील खेळाडू गुजरातच्या सुरतमधील दोडे गुर्जर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत चमकला. या स्पर्धेत त्यांनी आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करीत संघाला विजय मिळवून दिला. म्हैसवाडीच्या खेेळाडूस मालिकावीर पुरस्कारदेखील मिळाला. दोडे गुर्जर प्रीमियर लीग पर्व-5 2023 ही क्रिकेट स्पर्धा सुरत येथे पार पडली. यात नवागाम गुर्जर वॉरियर्स संघ विजेता तर डिंडोली वॉरीयर्स संघ उपविजेता ठरला. दोडे गुर्जर प्रीमियर लीग पर्व-5 2023 चे साई फकिरा ग्राउंड येथे आठ संघाचे सुंदर आयोजन केले होते.

नवलसिंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती
लीगचे प्रमुख अतिथी म्हणून जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील यांची उपस्थिती होती. लीगचे आयोजक हुकुमदादा पाटील-मोहिदेकर व मुख्य प्रायोजक किरण जाधव-आडगावकर तसेच मुख्य आयोजक देवेश पवार मितावलीकर, प्रमोद पाटील, वढोदेकर, दीपक चौधरी, तांदळवाडीकर यांनी आठही संघाचे अतिशय सुंदर नियोजनबद्ध आयोजन केले. या लीगमध्ये बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डर डिंडोली वॉरीयर्स संघाचे चेतन पाटील (कलालीकर) आणि बेस्ट बॉलर डिंडोली वॉरियर्स संघाचे ललित पाटील (म्हैसवाडीकर) ठरले आहेत. दोडे गुर्जर प्रीमियर लीग पर्व पाचमध्ये मुख्य खेळाडू म्हणजेच मोस्ट वेल्युऐबल प्लेयर आणि मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर डिंडोली वॉरीयर्स संघाचे ललित पाटील (म्हैसवाडीकर) ठरले आहेत. त्यांच्या या यशाचे श्रेय हुकूम पाटील (मोहिदेकर) यांना दिले.


गुर्जर समाजात आपली भाषा टिकून राहावी म्हणून मेहनत घेणारे आणि गुर्जर भाषा हाच आपला अभिमान, असं ब्रीद वाक्य देऊन ललित पाटील (म्हैसवाडीकर) यांनी आपली बोली भाषा टिकावी म्हणून मेहनत घेत आहेत. त्याबद्दल आयोजक प्रमोद पाटील यांनी आभार व्यक्त केला. या सदर लीगमध्ये ललित पाटील (म्हैसवाडीकर) यांना आयोजकांकडून आकर्षक नवीन सायकल व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. डिंडोली वॉरियर्स संघाचे प्रायोजक महेंद्र पाटी ल(आव्हाणेकर) आणि आयोजकांनी डिंडोली वॉरियर्स संघाचे मनोबल वाढविले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !