पंजाबनिर्मित दारू महाराष्ट्रात विक्रीचा डाव उधळला : शिरपूर पोलिसांच्या कारवाईत 50 लाखांचा मद्यसाठा जप्त

शिरपूर शहर पोलिसांची धाडसी कारवाई : यंत्रणेला पाहताच आयशर चालकाचे पलायन


Plot to sell Punjab-made liquor in Maharashtra foiled : Shirpur police seized liquor stock worth 50 lakhs शिरपूर : पंजाब राज्यात निर्मित दारूची महाराष्ट्रात तस्करी होत असल्याची माहिती शिरपूर शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत तब्बल 50 लाख रुपये किंमतीची दारू जप्त केली तर चालक मात्र पोलिसांना पाहताच पसार झाला. विशेष म्हणजे आरोपींनी दारूच्या बाटल्यांवरील लेबल, बारकोड, बॅण्ड रोल खोडून पुरावा नष्ट करण्यात आल्याचा प्रकारही समोर आला आहे. अवैध मार्गाने दारू करणारे मोठे रॅकेट असल्याची दाट शक्यता यंत्रणेला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूरचे शहर निरीक्षक ए.एस.आगरकर यांना दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 4 रोजी रात्री 10 वाजता सापळा रचला. बोराडी-वाडीमार्गेट आयशर (आर.जे.19 जी.एच.8482) आल्यानंतर चालकास थांबण्याचा इशारा केला मात्र त्याने वाहन पळवल्याने पथकाने पाठलाग सुरू केल्यानंतर काही अंतरावरील बोराडी गावाजवळ अंधारात वाहन सोडून चालक पसार झाला.






50 लाखांचा दारू साठा जप्त
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात केवळ पंजाब राज्यात निर्मित व तेथेच विक्रीची मुभा असलेली दारू महाराष्ट्रात विक्रीसाठी आणल्याचा प्रकार उघडकीस आला. दारूचा मालक, दारूचा खरेदीदार, पुरवठादार व वाहन मालक यांनी संगनमताने हा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले. वाहनातून रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट, रॉयल चॅलेंन्ज, मॅकडॉल नंबर वन कंपनीच्या विस्कीसह एकूण 49 लाख 21 हजार 180 रुपयांचा विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला व 30 लाख रुपये किंमतीचे आयशर वाहन जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलिस निरीक्षक ए.एस.आगरकर, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, संदीप दरवडे, हेमंत खैरनार, गणेश कुटे, हवालदार ललित पाटील, प्रेमसिंग गिरासे, रवींद्र आखडमल, प्रमोद ईशी, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोद आखडमल, भटू साळुंखे, सचिन वाघ, मनोज दाभाडे, मनोज महाजन, प्रशांत पवार, दीपक खैरनार, विवेकानंदन जाधव, भूपेश गांगुर्डे, मोहन सूर्यवंशी, सुशीलकुमार गांगुर्डे, शांतीलाल पवार, चालक रवींद्र महाले, होमगार्ड मिथून पवार, शरद पारधी, चेतन भावसार आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !