ओबीसी नेते छगन भुजबळांबद्दल बेताल वक्तव्य : वरणगावात मनोज जरांगे पाटलांचा निषेध
Absurd statement about OBC leader Chhagan Bhujbal : Manoj Jarange Patal protests in Varangaon वरणगाव : माळी समाजाचे ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जळगाव दौर्यावर असताना जळगाव, भुसावळ, वरणगाव या ठिकाणी आपल्या भाषणातून माळी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल एकेरी शब्दात बेताल वक्तव्य केल्यानंतर माळी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या संदर्भात बुधवार, 7 रोजी माळी समाज आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचा निषेध करण्यात आला व सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, उठ सूट भुजबळ यांना मनोज जरांगे पाटील यांनी टार्गेट करू नये, अन्यथा माळी समाजही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष संतोष माळी यांनी दिला आहे.
एकेरी विधानाचा निषेध
निवेदनाचा आशय असा की, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात आलयानंतर 4 डिसेंबर रोजी जळगाव, भुसावळ, वरणगावातील आपल्या भाषणातून ओबीसींचे नेते मंत्री छगनराव भुजबळ यांच्या बद्दल एकेरी शब्दात उल्लेख केला. ‘त्याला मी पाहून घेईल त्याला किंमत देऊ नका’ अशा प्रकारचे अनेक बेताल वक्तव्य केल्याने समस्त माळी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर जरांगे-पाटलांचा निषेध नोंदवण्यात आला.


यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष संजय माळी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष माळी, पंच गणेश तुकडू माळी, निवृत्ती माळी, सुभाष माळी, सुनील माळी, सुरेंद्र थोरात, जे.बी. माळी, प्रल्हाद माळी, अरुण माळी, चेतन माळी, गंभीर माळी, पुरुषोत्तम माळी, भगवान माळी, कृष्णा माळी, विकास माळी, रितेश माळी, किरण माळी, निलेश माळी, दीपक माळी, संकेत माळी, ज्ञानेश्वर माळी, योगेश थोरात, शुभम माळी, विशाल माळी, भूषण माळी, वैभव माळी, भूषण माळी, पवन माळी, अनिकेत माळी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





