भुसावळ शहर भाजपच्या शहराध्यक्षपदी युवराज लोणारी


Yuvraj Lonari as city president of Bhusawal city BJP भुसावळ : भाजपाचे पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी भाजपची तालुका कार्यकारीणी जाहीर केली आहे. त्यात भुसावळ शहराचे माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांची शहराध्यक्षपदी तर प्रशांत पाटील यांची भुसावळ तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात केली आहे.

तालुका कार्यकारीणीत मिळाले स्थान
भारतीय जनता पक्षाची भुसावळ तालुका कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे. यात पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. परीक्षीत बर्‍हाटे यांची जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर रीक्त पदावर लोणारी यांची वर्णी लागली आहे. आमदार संजय सावकारे यांचे खंद्दे कट्टर समर्थक व त्यांचे निकटवर्तीय म्हणून युवराज लोणारी यांची ओळख असून आता त्यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.


पक्ष संघटन मजबूत होणार
भुसावळ शहराच्या राजकारणाचा तीन दशकांपासून अनुभव असलेल्या लोणारी यांच्या नियुक्तीमुळे भाजपला संघटनात्मक वाटचालीत फायदा होईल तर शहरात आणखीन पक्ष संघटन मजबूत होणार आहे. भुसावळ तालुक्याची धुरा प्रशांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. युवराज लोणारी यांच्या निवडीनंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

पूर्व कार्यकारीणी जाहीर
अन्य कार्यकारीणीत जामनेर शहराध्यक्षपदी चंद्रकांत बाविस्कर, बोदवड शहराध्यक्षपदी मधुकर राणे, मुक्ताईनगर प्रफुल्ल जवरे, रावेर महेश चौधरी, यावल उमेश फेगडे, चोपडा शहर नरेंद्र पाटील, चोपडा ग्रामीण चंद्रशेखर पाटील यांची निवड करण्यात आली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !