देवगडच्या समुद्रात पुण्याच्या सैनिकी स्कूलचे पाच विद्यार्थी बुडाले


सिंधुदर्ग : देवगडच्या समुद्रात पुण्याच्या सैनिकी स्कूलचे पाच विद्यार्थी बुडाल्याची घटना समोर आली असून त्यातील चौघा मुलींचे मृतदेह हाती लागले आहेत तर एकाचा शोध सुरू आहे. पुण्यातील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल देवगड येथे आली होती मात्र विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली.

पहिल्यांदाच घडली घटना
देवगड येथील समुद्र किनारा हा खोल नाही. हा पर्यटकांसाठी सुरक्षित किनारा ओळखला जातो. तारकर्ली, देवबाग, शिरोडा, वेळागर येथे अशा घटना घडल्या आहेत. देवगड समुद्रात अशी पहिलीच मोठी घटना आहे. पुण्यातील खासगी सैनिक अकॅडमीचे विद्यार्थी देवगड समुद्र किनार्‍यावर पर्यटनासाठी आले असता पाच समुद्रात बुडाले असून त्यातील चौघांचे मृतदेह हाती आले तर एकाचा शोध सुरू आहे.






चार जणांचे मृतदेह आढळले
मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर अजूनही बेपत्ता असून पोलिस स्थानिकांच्या मदतीने शोध सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !