ललवाणी फार्म हाऊसला हौशी सायकलस्वारांची भेट


भुसावळ : सातारा येथील समाजसेवक, पाच हौशी सायकलस्वारांनी सांगली ते अटारी (वाघा) बॉर्डर परत बॉर्डर ते सातारा असा हजारो किलोमीटरचा प्रवास सायकलीने करीत ‘सायकल चालवा निरोगी रहा’ चा संदेश दिला. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी त्यांनी लोकांना आपले अनुभव कथन केले.

विविध क्षेत्रात कार्यरत सायकलस्वारांनी जपला छंद
निरोगी राहण्यासाठी शुद्ध हवा, सायकल चालवणे, संवाद वाढवणे व सतर्क राहून आपली जीवनशैली निर्माण करा, असे त्यांनी नमूद केले. हौशी सायकलस्वारांनी महाराष्ट्रातून प्रवास करीत असताना कुर्‍हेपानाचे येथील ललवाणी फार्मला भेट देऊन काही काळ व्यतीत केला. त्यांनी प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांच्याशी हितगुज करताना अनेक बाबींवर प्रकाशझोत टाकला. प्रा.ललवाणी यांनी गोशाळा सुरू करण्याचा केलेला संकल्प पाहून ते हर्षभरीत झाले. त्यांनी कामांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. अंबरीश जोशी, विनोद दीक्षित, विजय वरुडे, शिवाजी कणसे, किशोर माने असे हे पाच सायकलस्वार होते. सर्वजण विविध क्षेत्रात कार्यरत असतांना सुध्दा त्यांनी हा छंद जोपासला आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !