पं.प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेत भुसावळातील नितीन धांडे यांना आरतीचा मान


जळगाव : जळगाव तालुक्यातील वडनगर येथे सुरू असलेल्या शिवपुराण कथेत लाखो भाविकांची दररोज गर्दी होत आहे. भाविकांच्या गर्दीत होत असलेल्या शिवपुराण कथेत दुपारी व सायंकाळी निवडक मान्यवरांना आरतीचा मान देण्यात आला आहे. भुसावळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा अष्टभूजा डेअरीचे संचालक नितीन धांडे यांना आरतीचा मान प्राप्त झाल्याने त्यांच्या हस्ते नुकतीच आरती करण्यात आली.

लाखो भाविकांची उपस्थिती
जळगाव तालुक्यातील वडनगरी फाट्याजवळील बडे जटाधारी मंदिराच्या विशाल प्रांगणावर गेल्या पाच दिवसांपासून शिवपुराण कथा सुरू आहे. ही कथा ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या काना कोपर्‍यातून लाखो भाविकांची गर्दी होत आहे. पं.प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून सादर होणारी कथा ऐकण्यासाठी भाविक भल्या सकाळीच कथा स्थळी दाखल होत आहेत. कथेच्या सुरूवातीला व सायंकाळी समाप्तीनंतर आरती केली जात असून त्यासाठी निवडक भाविकांना मान देण्यात आला आहे. भुसावळातील अष्टभूजा डेअरीचे संचालक तथा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनादेखील पं.प्रदीप मिश्रा यांच्या व्यासपीठानजीक जावून आरती करण्याचा मान मिळाल्याने या सन्मानाने ते भारावले आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !