काँग्रेस खासदाराकडे आयकराच्या धाडीत सापडले 351 कोटींचे घबाड


351 crore swindle found in income tax raid of Congress MP नवी दिल्ली : देशात सर्वात मोठी आयकराची कारवाई काँग्रेस खासदार आणि व्यावसायिक धीरज साहू यांच्याकडे करण्यात आली आहे. आयकराच्या धाडीत आतापर्यंत 351 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाने 5 दिवसांपूर्वी झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील 9 ठिकाणी छापेमारी केली.

रोकड मोजण्यासाठी 80 अधिकार्‍यांना फुटला घाम
साहू ग्रुपवर करचोरीचा आरोप आहे. यातूनच 6 डिसेंबरला आयकर विभागानं ही कारवाई सुरू केली. 176 बॅगेत ही रोख रक्कम ठेवली होती. यातील नोटा अधिकारी, कर्मचार्‍यांकडून मोजल्या जात आहेत. रविवारी संध्याकाळी भारतीय स्टेट बँकेचे विभागीय संचालक भगत बेहरा यांनी सांगितले की, ही रोकड मोजण्यासाठी आयकर विभाग आणि विविध बँकांचे 80 अधिकारी आणि 9 पथके गुंतले आहेत.हे सगळे 24 तास काम करत आहेत. त्यात सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर आणि अन्य कर्मचार्‍यांसह 200 अधिकार्‍यांची टीम जेव्हा अन्य ठिकाणी आणखी काही रोकड असल्याच्या 10 कपाटे मिळाली तेव्हा सहभागी झाली आहेत.






साहू कुटूंब मद्य उत्पादक
कथितपणे धीरज साहू यांचे कुटुंब एक प्रमुख मद्य उत्पादक आहेत. ते ओडिशातील अनेक कंपन्यांचे मालक आहेत. आयकर विभागाच्या या कारवाईनंतर काँग्रेसच्या धीरज साहू यांनी लांब राहणे पसंत केले आहे. धीरज साहू यांच्या व्यवसायाशी काँग्रेसचा काही संबंध नाही असा खुलासा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !