मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर खोचक टिका : आम्ही रस्ते धुतले मात्र त्यांनी तर तिजोरीच धुतली…!


Chief Minister’s comments on Thackeray : We washed the roads but he only washed the coffers…!
मुंबई :
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा टिकेचे बाण चालवले आहेत. आम्ही रस्ते धूतले मात्र त्यांनी तर तिजोरी धुतली. आम्ही रस्ता, बीच साफ करत आहोत मात्र त्यांनी ‘हात की सफाई’ केली अशा शब्दात् त्यांनी ठाकरेंवर टिका केली. आमदार म्हणून ठाकरेंना अधिवेशनाला हजेरी लावावीत लागेल असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला.

कांदा प्रश्न सरकार सोडवणार
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘कांदा प्रश्नाबाबत मी स्वत: पीयुष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे. इथेनॉल संदर्भातीही अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहोत. राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन गोयल यांनी दिल्याचेही शिंदे म्हणाले. दीड वर्षात शेतकर्‍यांना 10 ते 12 हजार कोटी रुपये दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेदेखील यावेळी त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !