भुसावळातील पाणीपुरवठा सुरळीत : जीर्ण पाईप लाईनची दुरुस्ती
Smooth water supply in Bhusawal: Repair of dilapidated pipe line भुसावळ : शहराला सोमवारपासून नियमित पाणीपुरवठा होणार असून जीर्ण पाईप लाईन लिकेज जोडणीचे काम पूर्ण झाल्याचे पालिकेने कळवले आहे. भुसावळ शहरातील रेल्वे कॉलनीत पाईप लाईन फुटल्यानंतर पाणीपुरवठा प्रभावीत झाला होता मात्र शनिवारी रात्री 12 वाजेपर्यत लिकेज पाईप लाईन जोडण्यात आली.
रविवारपासून पाणीपुरवठा सुरळीत
रविवारी सकाळी 9 वाजेपासून शहरात नियमीत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता रेल्वे कॉलनीतील रॉ वॉटरची पाईप लाईन लिकेज झाल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. शनिवारी रात्री काम पूर्ण झाल्यामुळे रविवारपासून शहरात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. सोमवारी शहरातील जळगाव रोड व जामनेर रोडवर पाणी पुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख म्हणाले. शहरातील नाहाटा कॉलेजजवळ सुध्दा पाईप लाईन लिकेज आहे. ती पाईप लाईन जोडण्याचे कामही येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा विभागातर्फे केला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.







