ईश्वरप्राप्ती हेच मानवाचे असावे ध्येय : स्वामी स्वरूप स्वानंद


Attainment of God should be the goal of man : Swami Swaroop Swananda भुसावळ : मानव जन्म हा आपले स्वहित साधून घेण्यासाठी आहे. मानवातील भावनेचा विकास व्हायला हवा. त्याचे विचार श्रेष्ठ असले पाहिजे त्यामुळे आपल्यातील पशूत्व कमी होऊन ईश्वराकडे प्रवास करत येईल. अज्ञान जाणीव नष्ट झाल्या पाहिजे. प्राप्त जीवनाचा आधार घेऊनच आत्म प्राप्ती करायची आहे, असे विचार ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यातील प्रवचन मालिकेचे प्रथम पुष्प गुंफताना स्वरूप स्वानंद म्हणाले.

उद्या समारोप
शहरातील कोळी समाज मंगल कार्यालय, गजानन महाराज नगरातसुरू असलेल्या ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यात स्वरूप स्वानंद मार्गदर्शन करीत आहेत. 9 ते 11 डिसेंबरदरम्यान हा सोहळा चालणार असून यंदा या उत्सवाचे 78 वे वर्ष आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली सांस्कृतिक व बहुउद्देशीय मंडळ भुसावल विगत 77 वर्षांपासून ही श्रेष्ठ परंपरा जोपासत आहे. सकाळी 8 ते 12.30 या वेळेत हे सामूहिक पारायण होईल. या उत्सवात दररोज सायंकाळी सात वाजता पुणे येथील स्वामी स्वरूप स्वानंद, डॉ.सुधीर पांडे यांची तीन दिवस आध्यात्मिक प्रवचने होणार आहेत. भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष भास्कर भोळे, सचिव डॉ.रमेश जोशी, उपाध्यक्ष सुरेश चौधरी, दिलीप झोपे व सर्व सदस्यांनी केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !