कांदा निर्यातबंदी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले
Onion export ban : Deputy Chief Minister Devendra Fadnavis made it clear नागपूर : राज्य विधी मंडळ अधिवेशनात विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला कांदा प्रश्नी धारेवर धरलं. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, कांद्याच्या प्रश्नावर मी स्वतः केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याशी चर्चा केली आहे मात्र निर्यात बंदी मागे घेतली तर कांद्याचा मोठा तुटवडा निर्माण होणार आहे. कारण यंदा 25 ते 30 टक्के कमी कांदा बाजारात आला आहे.
तर सरकार कांद्याची करणार खरेदी
फडणवीस पुढे म्हणाले की, कांदा प्रश्नी आम्ही केंद्र सरकारला मार्ग काढण्याची विनंती केली आहे. शेतकर्यांचे आम्ही अजिबात नुकसान होऊ देणार नाही, लिलावात अडचणी आल्या तर सरकार दर जाहीर करून कांदा खरेदी करेल, असं आश्वासनही फडणवीस यांनी दिले.


अनुदान न देणार्यांवर कारवाई करणार
गेल्यावेळीचे कांद्याचे अनुदान सहकारी बँकांनी दिले असले तरी राष्ट्रीय बँकांनी मात्र हे अनुदान दिलं नसल्याचा मुद्दा काही आमदारांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, संपूर्ण अनुदान वितरित करण्यात आले आहे. ते कुणी दिले नसेल आणि कर्ज खात्यात वळते केले असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.





