झारखंड काँग्रेसचे खासदार साहू यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे भुसावळात दहन
छापेमारीत आढळली 354 कोटींची संपत्ती : भाजयुमो महिला आघाडीचे आंदोलन
Symbolic effigy of Jharkhand Congress MP Sahu burnt in Bhusawal भुसावळ : देशातील सर्वात मोठी आयकराची कारवाई झारखंडमधील काँग्रेस खासदार आणि मद्य व्यावसायिक धीरज साहू यांच्यावर करण्यात आली. तब्बल सहा दिवसांच्या छापेमारीत 354 कोटींची रोकड जप्त करण्यात आली असून अद्यापही रोकडची मोजणी अधिकारी करीत आहेत. या घटनेचा भुसावळातील भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे निषेध करण्यात आला तसेच साहू यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
घोषणाबाजी करीत महिला पदाधिकार्यांचे आंदोलन
मामाजी टॉकीजजवळील रेल्वे दगडी पुलाजवळ भाजपा महिला पदाधिकार्यांनी काँग्रेस व खासदार साहू यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भ्रष्टाचारी हात करतो जनतेचा घात, कॅश की कठरी, पाप की गठरी ; मोहब्बत की दुकान, चोरी का सामान, काँग्रेस हटाव, गरीब बचाव, मळलेला हात करतो जनतेचा घात, काँग्रेसचा हात, पोटावर लाथ यासह विविध घोषणा देण्यात आल्या तसेच निषेधाच्या घोषणांचे फलकही झळकवण्यात आले. निषेधानंतर खासदार साहू यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला महिला पदाधिकार्यांनी चपलांनी तुडवत नंतर त्याचे दहन केले.





यांचा आंदोलनात सहभाग
भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अनिता आंबेकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात माजी नगरसेविका मीना लोणारी, वैशाली सैतवाल, सोनल महाजन, अलका शेळके, शोभा राजने, प्रतिभाताई बोचरे, पल्लवी वारके, शुभांगी जैन, मनीषा पाटील, शैलजा पाटील आदी महिला हजर होत्या.