संसदेत घुसखोरी ; स्मोक कॅण्डल जाळले ; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह ; चौघे ताब्यात


Intrusion into Parliament; SMOKE CANDLE BURNED ; Question marks on security ; Four in custody नवी दिल्ली : नव्या संसदेच्या सुरक्षेत मोठी कुचराई झाल्याचे समोर आले दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारल्याची घटना बुधवारी दुपारी घडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय आणि समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी ही सुरक्षाव्यवस्थेतली त्रृटी असल्याचं म्हटलं. दोघांनी संसदेत स्मोक कॅण्डल जाळल्या तर दोघांनीबाहेर निदर्शने केल्यानंतर चौघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेणार्‍यांपैकी एक तरुण महाराष्ट्रातील असून त्याचे नाव अमोल शिंदे आहे. तो लातूर जिल्ह्यातल्या झरी गावचा आहे.

जरीमध्ये गावात तगडा बंदोबस्त
संसदेतील या घटनेनंतर झरी गावात लातूर पोलिसांची अनेक पथकं दाखल झाली आहेत. दहशतवाद विरोधी पथक, एलसीबी आणि चाकूर पोलीस ठाण्याची पथकं या गावामध्ये दाखल झाली आहेत. पोलिसांकडून अमोल शिंदेंच्या घराची तपासणी करण्यात आली. तसंच घरातील सदस्यांची माहिती घेण्यात आली.






अचानक घडली घटना
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार. पब्लिक गॅलरीमधून दोन लोकांनी उडी मारली. उडी मारल्यावर एकदम धूर निघायला सुरुवात झाली. तिथे एकदम गोंधळ झाला. सगळे लोक धावायला लागले.

चर्चा सुरू असताना तरुणाने मारली उडी
जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास संपला होता आणि सदस्यांमध्ये कलम 377 वरून चर्चा सुरु होती. त्यावेळी एका युवकाने सभागृहात उडी मारली आणि तो अध्यक्षांच्या आसनाकडे धावत होता. संसद सदस्यांनी त्याला अडवलं आणि तोपर्यंत सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याने त्याच्यासोबत काही कलर बुटातून आणले होते. आता पोलिसांनी तरुणासह एका महिलेला अटक केली आहे.

22 वर्षांच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या
13 डिसेंबर 2001 रोजी पाकिस्तानमधून आलेल्या पाच दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला होता. ही संसद आता संविधान सदन म्हणून ओळखले जाते. या दहशतवादी हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे अनेक कर्मचार्‍यांसह 9 जण शहीद झाले होते. दरम्यान, तब्बल 22 वर्षानंतर बुधवारी नव्या संसदेत हल्ला झाला नसलातरी सुरक्षा व्यवस्था भेदून तरुणाने थेट खासदारांमध्ये जात स्मोक कॅण्डल्स जाळल्याने सुरक्षा व्यवस्थेतील त्रृटींवर आता बोट ठेवले जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !