शिवसेनेच्या युवा सेना जिल्हाप्रमुखपदी सुरज पाटील
Suraj Patil as District Youth Sena Chief of Shiv Sena भुसावळ : शिवसेनेच्या युवा सेना जिल्हाप्रमुखपदी सुरज पाटील यांची निवड करण्यात आली. याबाबतची घोषणा बुधवार, 13 रोजी शिवसेनेच्या मुखपत्र सामना वृत्तपत्रातून करण्यात आली. सुरज पाटील यांनी यापूर्वी युवा सेना शाखाप्रमुख, शहर चिटणीस, शहरप्रमुख, तालुकाप्रमुख म्हणून काम पाहिले. वयाच्या 26 व्या वर्षी त्यांची युवा जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुरज पाटील हे युवा सेना प्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे व शिवसेना सचिव वरून सरदेसाई यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात.







