चौपदरीकरणात डावलले : रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांचा आंदोलनाचा इशारा


Dropped in quadrupling: Raver’s businessman Shriram Patil warns of agitation रावेर : अंकलेश्वर-बहाणपूर महामार्ग चौपदरीकरणात रावेर व सावदा या शहरांना वगळण्यात आले आहे तर ग्रामीण क्षेत्रामार्गे चौपदरीकरण करून महामार्ग मुक्ताईनगर तालुक्याला जोडण्याचा प्रकार सुरू असल्याने चौपदरीकरणाबाबत जिल्हाधिकार्‍यांचे चुकीचे आदेश रद्द करावे, या मागणीसाठी रावेरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील पदाधिकार्‍यांनी तहसील कार्यालयात निवेदन दिले. याप्रश्नी आंदोलन छेडण्याचा इशारा उद्योजक श्रीराम पाटील यांनी दिला आहे.

दळण-वळणापासून वंचित ठेवण्याचे काम
पूर्वीपासून अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्यमार्ग क्रमांक-4 असे नाव वापरात आहे. हा रस्ता फैजपूर सावदा रावेर ते चोरवड पुढे बर्‍हाणपूरला जातो. त्यावर परिवहन नाके आजपर्यंत अंमलात आहे तसेच रावेर, सावदा व फैजपूर परीसर व या शहरातील सर्व शेतकरी, व्यापारी केळी वाहतुकीसाठी या मार्गाचा उपयोग करतात. असे असताना दोन्ही शहरांना दळणवळण सुविधेपासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रावेर विधानसभा मतदार संघात चौपदरी रस्त्याचे भूसंपादन वेगळ्या दिशेने करणे चुकीचे आहे. त्याऐवजी चौपदरी रस्ता रावेर व सावदा या शहरातून किंवा शहराला लागून करावा, अशी मागणी करण्यात आली. दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. नायब तहसीलदार संजय तायडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.


निवेदन देताना श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल मुत्तलीब, रावेर पीपल्स बँकेचे संचालक सोपान साहेबराव पाटील, महेमूद शेख, जि.प.चे माजी सदस्य आत्माराम कोळी, माजी सरपंच अतुल पाटील, सीताराम पाटील, स्वप्नील पाटील, राजेंद्र चौधरी, प्रशांत पाटील, गोविंद पाटील, घनश्याम पाटील, प्रवीण पाटील, रामचंद्र पाटील, डी.डी.वाणी, मनोज लोहार उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !