साक्री पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोतीराम निकम यांची नियंत्रण कक्षात बदली
संजय सूर्यवंशी साक्री पोलिस ठाण्याचे नूतन निरीक्षक : पदभार स्वीकारला
Inspector Motiram Nikam of Sakri Police Station has been transferred to the control room साक्री : साक्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील संजय सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
निरीक्षक नियंत्रण कक्षात अॅटॅच : पोलिस अधीक्षक
साक्री निरीक्षकांबाबत चार महिन्यांपासून तक्रारी असल्याने त्यांना नियंत्रण कक्षात तूर्त अॅटॅच करण्यात आले आहे. निरीक्षकांबाबत कसुरी अहवाल सादर करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू असल्याचे धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे म्हणाले.







