शेतकर्यांची वीज समस्येतून सुटका : हिंगणात 33/11 केव्हीच्या विद्यूत उपकेंद्राचे भूमिपूजन
बोदवड : बोदवड तालुक्यातील हिंगणा येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते चार कोटी 23 लाख रुपये खर्चातून 33/11 के.व्ही. विद्यूत उपकेंद्र उभारण्यात येत असून या केंद्राचे भूमिपूजन नुकतेच आमदारांच्या उपस्थितीत झाले. श्रीफळ वाढवण्याचा आमदारांनी सरपंच रामराव पाटील यांना दिला. बोदवड उपकेंद्रातून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत असल्याने शेतकरी वर्गासहित गावकर्यांना या अडचणीचा सामना करावा लागत होता. या संदर्भात शेतकर्यांनी समस्या सोडविण्याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली होती.
सुरळीत वीजपुरवठा मिळणार
बोदवड उपकेंद्रातून आमदगाव, हिंगणा, शिरसाळा, कोल्हाडी नाडगाव, नांदगाव, सोनोटी या गावांना वीजपुरवठा होतो. रब्बी हंगामात विजेची मागणी वाढल्याने बोदवड उपकेंद्रावर अतिरीक्त भार येउन वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रमाण वाढत होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी चार कोटी 23 लाख रकमेचे नवीन 33/11 के.व्ही.उपकेंद्र मंजूर केल्याने आता बोदवड उपकेंद्रावर अतिरीक्त विजेचा भार न येता वीजपुरवठा खंडित होणार नसल्याचे यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी परिसरातील शेतकर्यांसहित, ग्रामस्थांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला.


यांची होती उपस्थिती
यावेळी उपकार्यकारी अभियंता सचिन मुंडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान, तालुकाप्रमुख छोटू भोई, नगराध्यक्ष आनंदा पाटील, सरपंच रामराव पाटील, नगरसेवक सईद बागवान, नगरसेवक दिनेश माळी, नगरसेवक निलेश माळी, नगरसेवक हर्षल बडगुजर, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक कलीम शेख, देवेंद्र खेवलकर, शांताराम कोळी, दीपक माळी, अमोल व्यवहारे, अजय पाटील, मनोज पाटील, अमोल पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.





