कंत्राटी वीज कामगारांना सेवेत समावेशासाठी अधिवेशनावर मोर्चा

जळगाव जिल्ह्यातून शेकडो कामगारांचा सहभाग


March on convention for induction of contract electricity workers भुसावळ : राज्यातील महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील 42 हजार वीज कंत्राटी कामगारांना एनएमआर योजनेमधून सामावून घ्यावे आदींसह विविध मागण्यांसाठी सोमवारी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढला. या मोर्चात भुसावळ विभागासह जिल्ह्याभरातील कंत्राटी वीज कामगारांनी सहभाग नोंदवला.

मागण्यांबाबत निवेदन सादर
मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष अमर लोहार, उपमहामंत्री राहुल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार, संघटन मंत्री उमेश आणेराव, प्रदेश उपाध्यक्ष सचिन भावसार यांनी केले. अनेकवेळा निवेदने, आंदोलने, मोर्चाव्दारे शासनाचे, ऊर्जा मंत्री यांचे लक्ष वेधून कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे पण अद्याप ऊर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली नाही. त्यामुळे कामगारांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे, यातूनच हा मोर्चा निघाल्याचे सांगण्यात आले. मोर्चेकर्‍यांनी विविध मागण्यांचे निदर्शने देवून निवेदन सादर केले. पंजाब, राजस्थान, ओडीसा, हरियाणा या अन्य राज्यात ज्या पद्धतीने कंत्राटी कामगारांना कंत्राटदार रोजगार दिला व शासन सेवेत सामावून घेतले त्या प्रमाणे महाराष्ट्रातील वीज कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा. तिन्ही कंपनीतील विविध नियमित मंजूर रीक्त पदांच्या जागेवर वर्षानुवर्षे समान काम करत असलेल्या कुशल व अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करावे., भाटीया समितीच्या अहवालावर कार्यवाही व्हावी आदींसह प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !