यावल तहसीलमध्ये तलाठी व महसूल कर्मचारी संघटनेचे बेमुदत काम आंदोलन


यावल : यावल तहसील कार्यालयाच्या आवारात जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी तलाठी व महसूल संघटनेकडून गुरूवारी कर्मचार्‍यांनी एकत्र येत ठिय्या देत बेमुदत काम बंद आंदोलन केले. जोपर्यंत राज्य संघटनेकडून पुढील निर्णय होत नाही व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तलाठी तसेच महसूल चे कर्मचारी हे बेमुदत संपावर राहणार असल्याचा इशारा देण्यात आला.

जुन्या पेन्शन योजनेवर कर्मचारी ठाम
यावल तहसील कार्यालयाच्या आवारात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी मध्यवर्ती संघटनेशी संलग्न यावल तालुका तलाठी संघटना तसेच यावल तालुका महसूल कर्मचारी संघ यांच्या वतीने गुरूवारी ठिय्या देत बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी हे आंदोलन सुरू झाले आहे. या संदर्भात यापूर्वीच राज्य सरकारला नोटीस देण्यात आली मात्र जुन्या पेन्शन योजने संदर्भात राज्य सरकारने निर्णय ने घेतल्याने आता कर्मचारी हे बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहे.


यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनस्थळी तलाठी संघाचे यावल तालुकाध्यक्ष तथा मंडळाधिकारी एम. एच.तडवी, यावल तालुका महसूल कर्मचारी संघाच्या अध्यक्ष भाग्यश्री इंगळे, उपाध्यक्ष भारत वानखेडे, अतुल बडगुजर, मीना तडवी, बबीता चौधरी, ईश्वर कोळी, टी.सी.बारेला, एच.व्ही.मारोडे, ए.एस.महाजन, एम.बी.तडवी, व्ही.आर. तडवी, हेमा सांगोळे, एम.व्ही.कुरकुरे, हेमांगी वाघ, एस.वाय.तडवी, वैशाली पाटील, निशा चव्हाण, बी.ई.पाटील, एस.टी.भंगाळे, एम.आय.झोपे, सुचिता देशभ्रदार सह कर्मचार्‍यांची उपस्थिती होती

भूमि अभिलेख यावल कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी यांचा संप असल्याने यावल शहरातील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी यात सहभागी झाले. कर्मचार्‍यांनी एकत्र येत कार्यालया समोर घोषणा दिल्या. याप्रसंगी किशोर भारंबे, अशोक जामकर, जितेंद्र यादनिक, राजेश लोहार, कैलाश इंगोले, हैदर तडवी, जमशेर तडवी, अतुल राणे, न्याजोदिन तडवी हे सर्व कर्मचारी उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !