शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण : 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ


मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अधिवेशन सुरू असतानाही सुनावणी सुरू असून आता अपात्रतेला 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत तीन आठवड्यांची वाढ मागितली मात्र केवळ दहा दिवसांची वाढ देण्यात आली असून आता अपात्रतेवर 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

34 याचिकांचे सहा गटात वर्गीकरण
आमदार अपात्रता प्रकरणात दोन लाख पानांचे कागदपत्रे तयार आहेत शिवाय या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या 34 याचिकांचे सहा गटांत वर्गीकरण केल्यामुळे विविध सहा निकाल लागणार असल्याची माहिती आहे. विधीमंडळ सचिवालयाकडून सुनावणी कार्यवाही बुधवार, 20 डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच या संदर्भात विधीम ंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यांचा कालावधी मागितला गेला होता. त्याला आता 10 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !