आमदार एकनाथराव खडसे म्हणाले : भाजपा पक्ष सोडला नाही, सोडण्यास भाग पाडले !
MLA Eknathrao Khadse said : BJP did not leave the party, it was forced to leave! मुंबई : भाजपातून राष्ट्रवादीत आलेले आमदार एकनाथराव खडसे यांनी पुन्हा भाजपा पक्ष सोडण्याचे कारण सांगत उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्यावर टिका केली आहे. आजपर्यंत आपण भाजप पक्षावर कधीही टीका केली नाही. कारण, जो पक्ष मी वाढवला त्या पक्षाला नालायक म्हणणं, या मानसिकतेचा मी नाही. पण, पक्षातील काही लोकांमुळे मला भाजपा सोडावी लागली, असे म्हणत खडसेंनी आपल्या अपमानाबद्दल माहिती दिली. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे छोटे-मोठे अनुयायी, गिरीश महाजन यांच्यासारख्यांनी मला टार्गेट करीत बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच मला भाजपमधून वेगळं व्हावं लागलं,” अशी खंत आमदार एकनाथराव खडसे यांनी एका मुलाखतीत बोलून दाखवली.
भाजपाचा द्वेष कधीच केला नाही
आमदार खडसे या मुलाखतीत म्हणाले की, मी कधीही भाजपाचा द्वेष केला नाही वा आजपर्यंत मी भाजपावर कधीच आरोप केले नाहीत. मी जो पक्ष वाढवला त्या पक्षाला काही बरे-वाईट बोलणे माझी मानसिकता कधीच होणार नाही. पण, काही व्यक्तींविषयी माझा आक्षेप होता. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे छोटे-मोठे अनुयायी, गिरीश महाजन यांच्यासारख्यांनी मला टार्गेट करीत बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच मला भाजपमधून वेगळं व्हावं लागलं, असे आमदार खडसे म्हणाले. दाखवली.


मी बाहेर पडावं, अशी स्थिती निर्माण करण्यात आली
खडसे यांनी आपल्या होणार्या अपमानाचा पाढाच वाचून दाखवला. ते म्हणाले की, भाजपात असताना मला कोअर कमिटीतून बाहेर काढलं, मुख्य समितीतून बाहेर काढलं, निवड समितीतून बाहेर काढलं. बैठकांना जाणीवपूर्वक मी तिथं असताना मला सांगितलं जायचं की, तुम्हाला बैठकांना आमंत्रण नाही, हे सांगणं म्हणजे मला तर मेल्यासारखं व्हायचं, हे सांगून एकनाथ खडसेंनी भाजपात सर्वाधिक अपमानित कसं केलं गेलं, याचा खुलासाच केला.
मी अनेकदा भाषणांतूनही सांगायचो की माझा वारंवार अपमान होतोय, पण भाजपा सोडावं असं मला वाटत नाही. पण, शेवटी मी माणूस आहे, मला टोकाचं छळलं गेलं, तेव्हा मी पक्षातून बाहेर पडलो, असेही खडसेंनी म्हटले.





