आमदार एकनाथराव खडसेंचे आरोप बेछूट : त्यांची किव येते ; मंत्री गिरीश महाजन


MLA Eknathrao Khadse’s accusations are unprovoked : his kiv is heard; Minister Girish Mahajan जळगाव : सलीम कुट्टा याच्याशी संबंध असल्याच्या प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांचीदेखील एसआयटी चौकशी व्हावी, मंत्री महाजनांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी केली होती. या संदर्भात मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत मात्र ते बेछूट आरोप करीत आहेत, भाजपामध्ये त्यांनी केलेल्या कारनाम्यांमुळे त्यांचा पक्षाने राजीनामा घेतला, त्यांची आता किव येते, असेही महाजन म्हणाले.

आमदार खडसे तर मानसिक तणावात…!
मंत्री महाजन पुढे म्हणाले की, खडसे ज्या फोटोवरुन आरोप करत आहेत ते दहा वर्षांपूर्वीचे कुंभमेळाप्रसंगी मुस्लिम धर्मगुरुंच्या घरी असलेल्या विवाह सोहळ्यातील फोटो आहेत. भोसरी भूखंड प्रकरण, गौण खनिज उत्खनन प्रकरणात आलेल्या नोटीसमुळं एकनाथ खडसेंची परीस्थिती केविलवाणी झाली आहे. काय बोलावं हे आता एकनाथ खडसेंना कळत नाही त्यामुळं वाटेल ते बेछूट आरोप ते करत आहेत. वैफल्यग्रस्त परिस्थिती झाल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून अशा प्रकारे आरोप केले जात असल्याचे महाजन म्हणाले.


खडसेंमुळे जावयाला जेलवारी
आमदार खडसेंमुळं त्यांच्या घरच्या लोकांनाही भोगावे लागले. जावई जेलमध्ये जावून आले आहेत. खडसे म्हणतात मी काय केले नाही मग जावई जेलमध्ये का गेले? हे खडसेंनी सांगावे. खडसेंचा राजीनामा हा दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला नव्हता तर पक्षात राहून त्यांनी आर्थिक घोटाळे केल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !