भुसावळातील चेतन जैन यांची मानवाधिकार सुरक्षा ऑर्गनायझेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड


भुसावळ  : शहरातील चैतन जैन यांची मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनायझेशनच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. गतवर्षभरात शहर स्वयंसेवक पदावर असताना जैन यांनी समाजातल्या विविध समस्या मांडण्याचा ऑनलाईन पद्धतीने प्रयत्न केला. त्यांच्या कार्याची दखल घेत संस्थेच्या राष्ट्रीय महामंत्री यांनी जिल्हा उपाध्यक्षपदी पदोन्नती केली आहे.

मानवाधिक आयोगाला मान्यता
मानवाधिकार आयोग ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ज्याला संयुक्त राष्ट्रसंघाची कायदेशीर मान्यता आणि स्थान आहे. सर्व सदस्य राष्ट्रांनी आपापल्या देशात, मानवाधिकार आयोग स्थापन करून त्याला मान्यता दिली आहे. त्यांना त्यांच्या देशाच्या भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक मान्यता, राजकीय परीस्थिती आणि संविधानानुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य, कायदेशीर मान्यता आणि न्यायिक अधिकार देऊन, त्यांना अधिपत्याखाली प्रांतीय आयोग स्थापन करण्यास सक्षम केले आहे. लवकरच प्रत्येक जिल्ह्यात मानवी हक्क संरक्षण न्यायालये स्थापन करण्याचा प्रस्ताव असून लवकरच कार्यालय सुरू होऊ शकते, निस्वार्थ सामाजिक कार्यात सहभाग घेण्याकरिता इच्छुक असल्यास संस्थेशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


या अगोदरही चेतन जैन हे भारतीय शाकाहार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी कार्यरत होते शिवाय गोसेवा परिवार तसेच अहिंसा फाऊंडेशनचे सदस्य म्हणून सामाजिक काम करीत आहेत. त्यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !