मुक्ताईनगर विधानसभेसाठी माजी मंत्री खडसेच दावेदार
रोहिणी खडसे-खेवलकरांच्या नावाची चर्चा निरर्थक : पक्षाचा निर्णय मान्य -एकनाथराव खडसे
जळगाव : पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असून मात्र मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्यावतीने मीच इच्छुक असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी म्हटले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा मतदारसंघ असलेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून या वेळी खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे – खेवलकर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे.
पक्षात येणार्यांची निष्ठा तपासा
14 रोजी जळगावात झालेल्या भाजप शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत खडसे यांनी पक्षात येणार्यांची नष्ठा तपासा, असे आवाहन केले होते. त्या विषयी त्यांना विचारले असता खडसे म्हणाले की, या पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील पक्षात येणार्यांच्या निष्ठेबाबत वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याशी मी सहमत असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. पक्षात येणार्यांची निष्ठा तपासल्यास पक्षातील निष्ठावंतांवर अन्यायही होणार नाही, असेही ते म्हणाले तर मुक्ताईनगरातून आपणच इच्छूक असल्याचे त्यांनी म्हटले.