भुसावळ शहरातील हूडको कॉलनीतील ओपन स्पेसवर सुशोभिकरण
आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते भुमिपूजन
Beautification of open space at Hoodco Colony in Bhusawal भुसावळ : भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 20 मध्ये ओपन स्पेसवर सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले. प्रभाग क्रमांक 20 मधील जूनी हुडको कॉलनीतील ओपन जागेवर माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे सुशोभिकरणाचे काम मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन झाल्याने आता कामाला गती येणार आहे.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
शहरातील प्रभाग क्रमांक 20 मधील जुनी हुडको कॉलनी भागातील ओपन जागेवर सुशोभीकरण कामाला मंजुरी मिळाली आहे. या कामाचे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी महेश वाघमोडे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, पुरुषोत्तम नारखेडे, किरण कोलते, दिनेश नेमाडे, देवा वाणी, समाजसेवक राहुल तायडे, प्रभागातील रहिवासी शुभम नाईक, राजू आढले, बळीराम पाटील, प्रकाश डिंगरिया, राजू निकम, अशोक सोनवणे, महेश सोनवणे, विद्याधर काकडे, प्रमोद सपकाळे, विजय सैतवाल, शांताराम पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते.







