अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याचे वृत्त निराधार
Reports of poisoning of underworld don Dawood Ibrahim are baseless नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याचे वृत्त दोन दिवसांपासून सुरू आहे मात्र हे वृत्त निराधार असल्याचा खास दावा छोटा शकीलने केला आहे. दाऊद ठणठणीत असल्याचे शकीलने म्हटले आहे.
दाव्याने जगभरात उडाली होती खळबळ
पाकिस्तानातील एका महिला पत्रकाराने दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याचा दावा केला होता. या वृत्तानंतर पाकसह भारतात एकच खळबळ माजली होती. याविषयी उलटसुलट चर्चा रंगल्यानंतर छोटा शकीलने दाऊदच्या प्रकृतीविषयीच्या सर्वच बातम्या अफवा असल्याचे स्पष्ट करत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करा.









