भुसावळातील हरप्रीतसिंग वडेच यांचा ‘महाराष्ट्र उद्योग भूषण’ पुरस्काराने सन्मान
Harpreet Singh Vadech from Bhusawal honored with ‘Maharashtra Udyog Bhushan’ award भुसावळ : भुसावळातील आय सोलर पॉवर कंपनीचे संचालक हरप्रीतसिंग वडेच यांचा नुकताच महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्काराने पुण्यातील एका कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. राज्यभरातील निवडक उद्योजकांचा अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्याहस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. भुसावळातील हरप्रीतसिंग वडेच हे गेल्या सात वर्षांपासून आय सोलर पॉवर कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला परीचित आहेत. जळगावसह राज्यभरात त्यांचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. या व्यवसायातील मिळवलेल्या यशाची दखल घेत त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले.
कर्तव्यदक्ष उद्योजकांचा सन्मान
पुण्याच्या वाकड भागातील हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनमध्ये महाराष्ट्राची विश्वसनीय मार्केट रीसर्च करणारी संस्था रिसील.इनच्या वतीने महाराष्ट्रातील निवडक उद्योजकांना त्यांच्या क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘महाराष्ट्र उद्योग अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून 9000 पेक्षा अधिक नामांकन मागविण्यात आले होते. त्यापैकी 60 उद्योजकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते उद्योजकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


देशाचा आर्थिक पाया मजबूत व्हावा
रिसील.इनचे सि.ई.ओ.सुधीर पठाडे म्हणाले की, महाराष्ट्र आणि देशाचा आर्थिक पाया मजबूत व्हावा, युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, उद्योजकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी तसेच त्यांचा उद्योग हा मोठा कसा होईल, शासकीय योजना आणि त्यांचा वापर कसा केला पाहिजे या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पुरस्काराने मिळाले बळ : हरप्रीतसिंग वडेच
हरप्रीतसिंग वडेच यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, गेल्या सात वर्षांपासून व्यवसायात कार्यरत आहे. पुरस्कार मिळाल्याने अधिक चांगले कार्य करण्याचे बळ मिळाले आहे. पुरस्कार मिळाल्याने अत्यंत समाधानी असून भविष्यात ग्राहकांना आणखी उत्तम प्रकार सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असेल.





