भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयाच्या सुजल शुक्लाची आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी निवड


भुसावळ : भुसावळ शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील प्रथम वर्ष बीसीएची विद्यार्थिनी व खेळाडू सुजल महेंद्र शुक्ला हिने आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा, जळगाव व जळगाव विभाग संघाकडून खेळताना आंतर विभागीय फुटबॉल स्पर्धा, शिरपूर येथे उत्कृष्ट कामगिरी केल्याने तिची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ महिला फुटबॉल संघात निवड झाली.

22 ते 26 दरम्यान स्पर्धा
आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धा आय.टी\एम.विद्यापीठ ग्वालियर, मध्यप्रदेश येथे 22 ते 26 डिसेंबर दरम्यान होत आहे. या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी सत्कार व अभिनंदन केले. यावेळी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.दीपककुमार जैस्वार, उपस्थित होते. यश संपादन केल्याबद्दल प्रा.डॉ.दिनेश पाटील, विद्यापीठ क्रीडा संचालक, महाविद्यालयातील क्रीडा समिती सदस्य प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.ए.आर.सावळे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !