दीपनगर प्रकल्पग्रस्तांचा रेल्वे रूळावर ठिय्या


In Deepnagar, the project victims stopped on the train track भुसावळ : दीपनगर प्रकल्पासाठी जमिनी देवूनही प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना अद्याप नोकरी मिळाली नसल्याने तसेच अन्य न्याय मागण्यांसाठी दीपनगर औष्णिक केंद्र प्रकल्पग्रस्त पुर्नवसन समितीने बुधवारी 660 मेगावॅट प्रकल्पाला कोळसा वाहतूक करणार्‍या रेल्वे लाईनीवर ठिय्या मांडून आंदोलन केल्याने प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महानिर्मितीच्या मुख्यालयातून गुरुवार, 28 डिसेंबर रोजी अधिकारी येणार असल्याने त्यावेळी हा प्रश्न सोडवण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, बैठकीत प्रश्न न सुटल्यास 2 जानेवारी रोजी 500 बाय दोनची कोळसा रेल्वे वाहिनीवर रेल रोको तर 3 जानेवारी रोजी महामार्गावर रास्तारोकोचा इशारा दिला.

या मागण्यांसाठी आंदोलन
प्रकल्पग्रस्तांना 12 हजार रुपये विद्यावेतनावर दोन वर्ष प्रशिक्षण कालावधी द्यावा, पुढील भरतीत त्यांना प्राधान्य दिले जावे, तंत्रज्ञ तीन या पदाची भरती काढून प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी उमेदवारांना नोकरीत समाविष्ट करुन घेण्यात यावे, वयाच्या 45 वर्षानंतर प्रकल्पग्रस्तांना नोकरीवरुन कमी केले जाते, त्यावेळी त्याच्या पाल्यांना नोकरीत समाविष्ट करावे आदींसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.


यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनप्रसंगी मुख्य अभियंता मोहन आव्हाड, प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे आदींनी आंदोलकांची भेट घेत आश्वासन दिले. यावेळी पुर्नवसन समितीचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, अशोक बर्‍हाटे, अरुण पाटील, शरद फेगडे, संतोष मेश्राम, विकास वाघोदे, केशव बर्‍हाटे आदी उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !