सशस्त्र दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पाच जवान शहिद


Five jawans martyred in attack by armed terrorists नवी दिल्ली : लष्करावर दुसर्‍यांदा दहशतवादी हल्ला झाल्याची घटना जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात घडली असून या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले असून दोने जखमी झाले आहेत. राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद आणि मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्याची जबाबदारी पीएफएफने घेतली आहे. लष्कराने गोळीबाराला प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, यापूर्वी 22 नोव्हेंबरला राजौरी येथे झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद झाले होते.

सैनिकांना नेताना गोळीबार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला थानमंडी-सुरनकोट मार्गावरील डेरा की गली गावाच्या परिसरात झाला. हे वाहन बफलियाज येथून सैनिकांना घेऊन जात होते. बुधवारी रात्री सुरक्षा दलांनी सुरनकोट आणि बुफलियाजमध्ये दहशतवाद्यांविरोधात घेराव आणि शोध मोहीम सुरू केली होती. लष्कराला आज ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या सुरक्षा दलांशी संपर्क साधता आला, त्यानंतर अतिरिक्त सुरक्षा दल येथे पाठवण्यात आले.




शस्त्रे पळवली दशशतवाद्यांनी
ज्या जवानांवर हल्ला झाला त्यांची शस्त्रे दहशतवाद्यांनी पळवून नेली असण्याची शक्यता अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. ऑपरेशन सुरू असताना, अधिकारी अधिक माहिती गोळा करण्याचा आणि परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या हल्ल्याच्या काही आठवड्यांपूर्वी, जवळच्या राजौरी जिल्ह्यातील बाजीमल वनपरिक्षेत्रातील धरमसाल पट्ट्यात गोळीबारात दोन कॅप्टनसह पाच लष्करी जवान शहीद झाले होते.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !