भुसावळात खासदार कल्याण बॅनर्जीच्या निषेधार्थ भाजपाचे निषेध आंदोलन

आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प : खासदार राहुल गांधींच्याही निषेधार्थ घोषणाबजी


BJP’s protest movement against MP Kalyan Banerjee in Bhusawal भुसावळ : लोकशाहिचे मंदिर असलेल्या संसद भवनात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या (व्यंगत्वावर) अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन केले व त्याचे खासदार राहुल गांधी यांनी चित्रण केल्याच्या निषेधार्थ भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळ भाजपा पदाधिकार्‍यांनी गुरुवारी दुपारी 12 वाजता निषेध आंदोलन केले. यावेळी इंडिया आघाडीच्या निषेधार्थ बॅनर झळकावून घोषणाबाजी करण्यात आली तर राहुल गांधी व खासदारा कल्याण बॅनर्जी मुर्दाबादच्याही घोषणा देण्यात आले. दहा मिनिटे चाललेल्या आंदोलनामुळे जामनेर रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती.

आंदोलनामुळे वाहतूक ठप्प
गुरुवारी दुपारी 11.30 वाजता रेल्वे लोखंडी पुलाजवळ सर्व भाजपा पदाधिकारी जमल्यानंतर निषेध आंदोलनाला सुरूवात करण्यात आले. जामनेर रस्त्यावर पदाधिकार्‍यांनी आल्यानंतर त्यांनी खासदार बॅनर्जी व खासदार राहुल गांधी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी तसेच बॅनर व फलक झळकावून निषेध केला. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने हा परीसर दणाणला होता. 10 ते 15 मिनिटे आंदोलन सुरू असल्याने यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची कोंडी झाली होती.


यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, मुक्ताईनगर विधानसभा निवडणुक प्रमुख अशोक कांडेलकर, रावेर लोकसभा विस्तारक विलास चौधरी, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, हरीलाल कोळी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, भुसावळ शहराध्यक्ष युवराज लोणारी, भुसावळ तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, रावेर तालुकाध्यक्ष महेश चौधरी, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, उज्जैनसिंग राजपूत, राकेश फेगडे, बोदवड तालुकाध्यक्ष मधुकर राणे, भुसावळ विस्तारक रामाशंकर दुबे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखर अग्रवाल, उद्योजक मनोज बियाणी, प्रमोद सावकारे, शैलेजा पाटील, गौतमी बारेला, भुसावळ विधानसभा निवडणूक प्रमुख संजय पाटील, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राहुल तायडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष जितेंद्र कोळी, सकेगाव सरपंच आनंदा ठाकरे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, पुरुषोत्तम नारखेडे, देवेंद्र वाणी, अजय नागराणी, निकी बतरा, गिरीश महाजन, अ‍ॅड.बोधराज चौधरी, रवी सपकाळे, दिनेश नेमाडे, बापू महाजन, महेंद्रसिंग ठाकूर, भा.ज.प पदाधिकारी व कार्यकर्ते शंकर शेळके, खुशाल जोशी, प्रा.धीरज गणेश पाटील, अमोल पाटील, प्रवीण इखणकर, बिसन गोहर, राजू खरारे, जे.पी.शुक्ला, प्रमोद पाटील, विलास अवचार, माहुरकर, पवन बुंदेले, रवी ढगे, शिशिर जावळे, राजेश यादव, गोकुळ बाविस्कर, कृष्णा शिंदे, श्रेयस इंगळे, संदीप सुरवाडे, गौरव आवटे, गौरव लोणारी, वैभव लोणारी, विशाल नाटकर, नागेश खरारे, शेखर धांडे, प्रशांत देवकर, अनिकेत पाटील, साजिद भाई, सुमित बरहाटे, भावेश चौधरी, सागर चौधरी, गोपीसिंग राजपूत, नंदकिशोर बडगुजर, चेतन बोरोले, सागर जाधव, यशांक पाटील इ.तसेच मोठ्या संख्येने भा.ज.पा.चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !