भुसावळातील चंद्रशेखर अग्रवाल यांचा अग्रवाल समाजातर्फे सत्कार
भुसावळ : भुसावळातील चंद्रशेखर (मोंटू) अग्रवाल यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा भुसावळातील अग्रवाल समाजातर्फे सहृदय सत्कार करण्यात आला.
बुधवार, 20 रोजी मोंटू अग्रवाल यांचा वाढदिवस असल्याने वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतनही करण्यात आले. याप्रसंगी योगेश अग्रवाल, भिकचंद अग्रवाल, संजय गर्ग, संजय सिंहल, शाम सांभरीया, राजेश अग्रवाल, जगदीश अग्रवाल, सतीश अग्रवाल, रवींद्र अग्रवाल, सागर अग्रवाल आदींची उपस्थिती होती.







