छोट्या व्यापार्यांनी आपल्या उद्योगासाठी बँकिंग धोरण निश्चित करावे
अॅड.रोहिणी खडसे : निंभोरा येथे राष्ट्रवादी ओबीसी सेल तर्फे उद्योजक शिबिर
खिर्डी : ग्रामीण भागामध्ये छोट्या व्यापार्यांनी व्यापार करताना आपल्या व्यवसायाची वृद्धी कशी होईल व त्यासाठी शासकीय योजनांचा लाभ कसा घेता येईल या अनुषंगाने नेहमी सजग राहिले पाहिजे. बॅकींग क्षेत्राने त्यासाठी अनुकूल असले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष अॅड.रोहिणी खडसे यांनी निंभोरा येथील उद्योजक शिबिरामध्ये व्यक्त केले. निंभोरा येथे खासदार शरद पवार यांच्या वाढदिवस सप्ताहनिमित्ताने राष्ट्रवादी ओबीसी सेलतर्फे उद्योजकता शिबिर झाले.
यांची प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे, रावेर राष्ट्रवादी लोकसभा क्षेत्रप्रमुख अतुल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे पर्यवेक्षक जगदीश पाटील, सरपंच सचिन महाले, माजी सरपंच डिगंबर चौधरी, पं.स.चे माजी सदस्य दीपक पाटील, योगेश पाटील, योगीता वानखेडे, प्रमोद कोंडे उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी केले तर सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक सागर रोकडे, स्टेट बँकेचे व्यवस्थापक राधेश्याम मुळे यांनी मनोगत व्यक्त केले. खादी ग्रामोद्योग महामंडळाचे पर्यवेक्षक जगदीश पाटील यांनी विविध शासकीय योजना व अनुदान व्यापारी दृष्टीने कसे फायदेशीर राहील आपल्या व्यवसायासाठी त्याचा कसा अवलंब केला पाहिजे यासोबतच व्यवसायाच्या वेगवेगळ्या अडचणी व त्यांचे उपाय यावर भाष्य केले. अॅड.रोहिणी खडसे यांनी व्यापार्यांसाठी मार्गदर्शन या शिबिराचे कौतुक करुन बँकिंग व्यवस्थेच्या अडचणी व त्यावर समाधान करण्याबाबत कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले.


अतुल पाटील यांनी व्यापारी वर्गाने कर्ज घेण्यास न घाबरता आपल्या व्यवसायाची वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करून व्यवसायाभिमुख होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीलशाद शेख यांनीही मनोगत व्यक्त केले. ललित कोळंबे, राजीव बोरसे, दस्तगीर खाटीक, मनोहर तायडे, रवींद्र भोगे, गुणवंत भंगाळे, राजीव भोगे, धीरज भंगाळे, हेमंत पवार, निवृत्ती चौधरी, अमजद खान, डॉ.जयेश वाणी यांच्यासह निंभोरा व खिर्डी येथील व्यापारीबांधव उपस्थित होते.





