भुसावळातील ताप्ती पब्लीक स्कूलमध्ये ग्रीन हाऊसने मारली बाजी
भुसावळ : शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये दोन दिवशीय वार्षिक क्रीडा स्पर्धा तसेच नाताळ निमित्त कार्यक्रम पार पडला. भुसावळच्या तहसीलदार नीता लबडे यांनी द्वीपप्रज्वालन करीत कार्यक्रमाचे उद्घाटन केले. नर्सरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस मिळविले. यानंतर विद्यार्थ्यांनी नाताळ गीत गायले.
शुक्रवार, 21 रोजी प्रमुख पाहुणे म्हणून डीवायएसपी कृष्णात पिंगळे, सॅक्रेट हार्ट चर्चचे फादर बर्नाडीट डिसूजा, रेल्वे स्कूलचे सेवानिवृत्त प्राचार्य अॅड.आय.आय.खान, रेल्वे सेवानिवृत्त एथेलेटिक कोच अशोक सपकाळे उपस्थित होते. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिल त्यात योगा, पॉम पॉम, सेल्फ डिफेन्स, हॅन्की ड्रील, लेझीम, बटरफ्लाय ड्रील, ऐरोबिक्स, कॅरल साँग, क्रिब डेकोरेशन, 100 मीटर रेस, 400 मीटर रेस तसेच विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.


ग्रीन हाऊस प्रथम
स्पर्धेत प्रथम स्थानी भूमी (ग्रीन) हाऊस, द्वितीय स्थानी अग्नी (रेड) हाऊस, तर तृतीय स्थानी वायू (यलो) हाऊस विजयी झाले. प्राचार्य नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा तसेच खेळाचे महत्त्व समजावून सांगितले व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सोफिया पीबॉडी, कय्युम शेख यांनी केले. सर्व क्रीडा शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.





