सारंगखेडा पोलिस ठाण्याच्या लाचखोर पोलिस निरीक्षकासह शिपायाला दोन दिवसांची पोलिस कोठडी


Sarangkheda police station constable along with bribed police inspector sent to police custody for two days नंदुरबार :सारंगखेडा यात्रोत्सवात दारूचा व्यवसाय करू देण्यासाठी दहा हजारांची लाच मागून ती स्वीकारताना सारंगखेडा, जि.नंदुरबार पोलिस ठाण्याच्या निरीक्षकासह शिपायाला नाशिक एसीबीने अटक केली होती. संशयिताना रविवारी नंदुरबार न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस निरीक्षक संदीप उत्तमराव पाटील (44) व पोलिस शिपाई गणेश भामट्या गावीत (38) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

लाच स्वीकारताच दोघांना बेड्या
35 वर्षीय तक्रारदाराने सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त दारू वाहतुकीचा व्यवसाय करण्यासाठी परवानगी मागितल्यानंतर गणेश गावीत यांनी 21 हजार रुपये लाचेची मागणी केली तर तडजोडीअंती 10 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर शनिवारी दुपारी तीन वाजता गावीत यांना अटक करण्यात आली तर निरीक्षकाचाही लाच मागणीत सहभाग असल्याने त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, नाशिक एसीबीने हा सापळा यशस्वी केल्यानंतर संशयिताना रात्री नंदुरबार एसीबीच्या ताब्यात दिल्यानंतर रविवारी संशयिताना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक राकेश वाघ करीत आहेत.














मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !