दादर-अमृतसरला निंभोरा स्थानकावर हवा थांबा
रेल्वे महाव्यवस्थापकांना साकडे : अडचणी सोडवण्याची शेतकर्यांना अपेक्षा
Dadar-Amritsar air stop at Nimbhora station खिर्डी : निंभोरा रेल्वे स्थानकावर शुक्रवार, 22 रोजी सकाळी रेल्वेचे महाव्यवस्थापक आर.के.यादव यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उड्डाणपूलाची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने निंभोरा रेल्वे स्थानकावर दादर-अमृतसर एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी केली.
सकारात्मक दखल घेण्याची ग्वाही
दादर-अमृतसर एक्सप्रेस 50 ते 60 वर्षापासून निंभोरा रेल्वे स्थानकावर थांबत होती मात्र कोरोना काळापासून या एक्सप्रेसचा थांबा रद्द करण्यात आल्याने तब्बल 32 गावच्या प्रवाशांची गैरसोय हाते आहे. या परिसरातून मुंबई ते दिल्ली जाण्यासाठी तसेच वेगवेगळ्या शहरात संपर्क साधण्यासाठी एक्सप्रेसचाप थांबा बंद झाल्याने परिसरातील 32 गावातील प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे महाव्यवस्थापक आर.के.यादव यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. शेतकर्यांनी उड्डाणपुलाच्या शेजारील शेत रस्त्यांच्या बोगद्या संदर्भातील अडचणीची ही माहिती त्यांना दिली. यावेळी निंभोरा खिर्डी यांसह आदी गावातून ग्रामस्थ उपस्थित होते.







