नवयुग स्थापना दिनी हवी सार्वजनिक सुट्टी

भुसावळातील शिशिर जावळे यांची पंतप्रधानांकडे मागणी


Navayug Foundation Day should be a public holiday भुसावळ : येत्या 22 जानेवारी 2024 ला अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या गाभार्‍यात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा मंगलमय सोहळा म्हणजे स्वर्गापासूनही पेक्षाही सुंदर असा सोहळरा असणार आहे. साक्षात पृथ्वीवर एका आदर्श विचारांची प्रेरणा आणि ऊर्जा देणार्‍या एका नवीन युगाची स्थापना सर्वसंमतीनेत्या ठिकाणी होत आहे. ही नक्कीच संपुर्ण विश्वासाठी, सनातन हिंदू धर्मियांसाठी आनंदाची गौरवाची आणि अध्यात्मिक उन्नतीची बाब आहे. 22 जानेवारीला दरवर्षी नवयुग स्थापना दिन म्हणून जाहीर करण्यात यावा व या दिवशी सार्वजनिक सरकारी सुट्टी सुद्धा जाहीर करावी, अशा आशयाची मागणी सामजिक कार्यकर्ते श्री नमो विचार मंचचे अध्यक्ष शिशिर जावळे यांनी एका पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मंदिर कार्यात अनेकांचे योगदान
अयोध्येतील श्री राम मंदिराच्या निर्माणासाठी आणि तेथे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून येणार्‍या भावी पिढीला प्रभू श्रीरामांचा आदर्श घेण्याची प्रेरणा व ऊर्जा मिळण्यासाठी 22 रोजी सार्वजनिक सरकारी सुट्टी सुद्धा जाहीर करण्याची मागणी शिशिर जावळे यांनी केली आहे. ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला अशा अयोध्येमध्ये शेकडो वर्षांपासून श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी हजारो कार सेवकांनी, महात्म्यांनी, विविध स्तरातील कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन श्रीराम मंदिर निर्माण कार्यामध्ये आपलं फार मोठे योगदान दिल्याचेही जावळे यांनी म्हटले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !