न्हावी गावातून सव्वापाच लाखांचा गुटखा जप्त : दोघांना अटक

गुटखा तस्करांच्या गोटात स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईने खळबळ


Gutkha worth 55 lakh seized from Nhavi village: Two arrested फैजपूर : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे न्हावी गावातून तब्बल पाच लाख 25 हजार रुपये किंमतीचा सुगंधीत पान मसाला व तंबाखू जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिता-पूत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. संशयिताना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कमलाकर बागुल, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख आदींनी न्हावी गावातील सुरेश किराणा दुकानासह मोहिनीकुंज या इमारतीतून पाच लाख 24 हजार 729 रुपये किंमतीचा सुगंधी तंबाखू व गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवार, 23 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी करण्यात आली. याप्रकरणी श्रीकृष्ण खंडेराव देशमुख यांच्या फिर्यादीवरून सुनील अशोक माखीजा (41, रा.न्हावी) व अशोक मगनलाल माखीजा (65, फैजपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ करीत आहेत.


कॉपी करू नका.