भुसावळ पालिकेची जीर्ण इमारत पाडण्यास अखेर सुरुवात


The demolition of the dilapidated building of Bhusawal Municipality has finally started भुसावळ : नगरपालिकेची 1882 मध्ये उभारण्यात आलेली ब्रिटिशकालीन जीर्ण झालेली इमारत पाडण्याच्या कामाला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली असून 15 दिवसापर्यंत हे काम चालणार आहे. 2018 मध्ये या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यात ही इमारत धोकादायक असल्याचे समोर आल्यानंतर आता 2023 च्या अखेरीस पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या इमारतीच्या आवारातील सुमारे 18 दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

पालिकेला गवसला अखेर मुहूर्त
2018 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी पालिकेला भेट दिली होती. यावेळी या इमारतीचे स्टॅक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यात ही इमारत धोकादायक असल्याने पालिकेच्या प्रशासकिय इमारतीचे स्थलांतरण करण्यात आले. त्यानंतर इमारत पाडण्याचे संकेत देण्यात आले मात्र मुहूर्त गवसत नव्हता. शुक्रवारपासून मात्र मजुरांकरवी इमारत पाडली जात आहे मात्र व्यापारी गाळ्यांना वगळण्यात आले आहे तर नोटीस बजावल्यानंतर संबंधित गाळे धारक न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाच्या निर्णय येताच हे गाळेही तोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दर्शनी भागातील दुकानांच्या वरिल पहिला माळ्याचा भागही तोडला जाणार आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !