नागरीकांनी पुन्हा चूक केल्यास देशात हुकूमशाही येणार ! उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
If citizens make a mistake again, dictatorship will come in the country! Attack of Uddhav Thackeray कुर्ला : “संपूर्ण देश सध्या कठीण वेळेतून जात आहे. देशाला कोण वाचवणार? जर यावेळी आपण पुन्हा एकदा चूक केली तर देशात हुकूमशाही येणार. जर देशात हुकूमशाही आली तर देशातील सद्भावना, नितिमत्ता संपून जाणार”, असे उद्धव ठाकरे कुर्ल्यात म्हणाले आहेत. कुर्ल्यातील मिल मैदानातील जैन धर्म गुरुंच्या प्रवचनाला आज सोमवारी उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. उद्धव ठाकरेंनी जैन धर्मगुरूंची भेट घेतल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
तर पुन्हा हुकूमशाही येणार
सध्या देशातील राजकीय स्थिती पाहता हुकूमशाही दारापर्यंत पोहोचली आहे. तिला उंबरठ्यावरच रोखण्याची गरज आहे. त्यामुळे आता चूक केली तर देशात देशात हुकूमशाही येईल असा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे.



“ज्या प्रकारे आताच काही वेळापूर्वी जैन धर्मगुरूंनी सांगितले की, सदभावना हवी, नितिमत्ता हवी याच बरोबर आपल्या देशाला आता स्वातंत्र्याची गरज आहे. देशाने स्वातंत्र्याची लढाई लढली आणि ती जिंकली. मात्र आज देशात तेच स्वातंत्र्य टिकवण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे”, असे उद्धव यावेळी म्हणाले.






