फैजपूर पोलिस उपअधीक्षक अन्नपूर्णा सिंह रुजू
Faizpur Deputy Superintendent of Police Annapurna Singh joins फैजपूर : फैजपूर पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांची चोपडा विभागाच्या पोलिस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आल्यानंतर फैजपूर विभागासाठी सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांची बदली करण्यात आली होती. सिंह यांच्या बदलीनंतर नुकतीच त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
प्रथमच लाभल्या महिला आयपीएस अधिकारी
अन्नपूर्णा सिंह या 2020 च्या त्रिपुरा बॅचच्या आयपीएस अधिकारी असून प्रथमच फैजपूर येथे आयपीएस अधिकारी रुजू झाल्या आहेत. सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांचे पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांनी यावेळी स्वागत केले.







