पक्ष बळकटीसाठी मोट बांधावी : शमीभा पाटील
मुक्ताईनगर येथील वंचित बहुजन आघाडीची सभा
Mot should be built to strengthen the party : Shamibha Patil मुक्ताईनगर ः कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून प्रत्येक कार्यकर्त्याने पक्ष बळकटीसाठी मोट बांधावी तरच विजयी राजकारणाकडे वाटचाल होईल त्यासाठी प्रत्येकाने नैतीक जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षा शमीभा पाटील यांनी मुक्ताईनगर येथे केले. जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच मुक्ताईनगर येथे पक्ष बळकटी करणासंदर्भात व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष मजबुत करण्याबाबत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दिलीप पोहेकर होते.
यांची बैठकीला उपस्थिती
प्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बाळा पवार, बबन रामदास इंगळे, अनोमदर्शी तायडे, जिल्हा उपाध्1यक्ष इमरान तडवी, महिला आघाडीच्या संगीता धोबी, बोदवड तालुक्याचे अध्यक्ष सुपडू निकम यांच्यासह तालुका व जिल्ह्यातील पदाधिकार्यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक नवनिर्वाचित जिल्हा सचिव विश्वनाथ मोरे यांनी केले. वैयक्तिक मतभेद सोडून पक्षासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे अन्यथा गुलामी आल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. बाळा पवार यांनी मनोगतात वंचित बहुजन आघाडी हा शिस्तप्रिय पक्ष असून आज जिल्ह्याला अभ्यासू आणि कणखर असे नेतृत्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी शमीभा पाटील यांच्या रूपाने दिला असल्याचे ते म्हणाले. आम्ही बाळासाहेबांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असून शोषित पीडित वंचित समूहाला एकत्र करून त्यांना सत्तेच्या खुर्चीत बसण्याचे काम बाळासाहेब करीत आहेत त्यांच्या या कार्याला प्रत्येकाने हातभार लावावा, असे आवाहनही पवार यांनी केले दिलीप पोहेकर यांनी केवळ पदाला महत्व न देता पक्ष बळकटीसाठी कार्य करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले.


वंचितांना एकत्र आणण्याची गरज
जिल्हाध्यक्ष शमीभाताई पाटील म्हणाल्या की, राजकारणात सुद्धा आपण वंचितच आहोत त्यामुळे वंचितांना एकत्र येण्याची गरज आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला राजकीय महत्त्वकांक्षा असावी आम्ही आर्थिकदृष्टया मजबूत नसलो तरीही आमची निष्ठा ताकद हीच आमची रसद आहे. पक्ष बांधणीत व प्रत्येक कार्यकर्त्याचा वाटा असणे गरजेचे आहे. घर तिथे कार्यकर्ता, गाव तिथे शाखा या संकल्पनेस मूर्त रूप दिली तरच विजयी राजकारणाकडे आपली वाटचाल होईल, असा आशावादही शमीभा पाटील यांनी व्यक्त केला. समाधान गवई, उखा बोंबटकर, दौलत वाकोडे, गणेश तायडे, सिद्धार्थ थाटे, तालुका महासचिव माणिकराव इंगळे, समाधान थाटे, बंटी गुरचळ, पंचशील टेलर, रवींद्र बोदडे , शैलेश वानखेडे , आप्पा वानखेडे, सुनील धुरंधर, गजानन मगरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी निवड झालेल्या जिल्हा, तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकार्यांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन अॅड.कुणाल गवई यांनी आभार मुक्ताईनगर तालुक्याचे युवक आघाडीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष अमोल बोदडे यांनी मानले.





