भुसावळात कोळी समाजाच्या वधू-वर परीचय सूचीचे प्रकाशन
Publication of bride-to-be introduction list of Koli community in Bhusawal भुसावळ : शहरातील कोळी मंगल कार्यालयात कोळी समाजाच्या वधू-वर परीचय सूचीचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. सुरवातीला महर्षी वाल्मिकी ऋषींच्या प्रतिमेस कोळी समाज विकास मंडळाचे खजिनदार अभिमन्यू सोनवणे यांनी पुष्पहार अर्पण केला.
यांची होती उपस्थिती
सूचीचे प्रकाशन कोळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, उपाध्यक्ष नितीन सोनवणे, राज्यस्तरीय कोळी समाज वधू-वर मेळाव्याचे अध्यक्ष चंद्रकांत सूर्यवंशी, वसंत सपकाळे, दीपक सोनवणे, भागवत सपकाळे, विजय तावडे, धर्मा कोळी, रोहिदास सोनवणे, दत्तात्रय सपकाळे, गोकुळ सपकाळे, रवींद्र सोनवणे, विलास सपकाळे, दिलीप सोनवणे, कार्तिक सोनवणे आदी समाजबांधव उपस्थित होते.







