सर्वे काहीही म्हणो ; हवा नरेंद्र मोंदीजींची ; लोकसभेत आम्ही 40 पार जाणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


Survey say anything ; Hawa Narendra Mondiji ; We will cross 40 in Lok Sabha: Deputy Chief Minister Devendra Fadnavis मुंबई : सी-व्होटर सर्वेत राज्यात महाविकास आघाडीला 40 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज व भाजपाच्या जागा काही प्रमाणात कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सर्व्हेबाबत मोठे विधान केले आहे. सर्वच सर्वेंचा आपण आदर करतो मात्र हवा केवळ मोदीजींची असून लोकसभेत 40 वर जागांवर आम्हाला यश मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, या सर्व्हेबाबत शरद पवारांनी सर्व्हेवर भरवसा ठेऊ नका, असं थेट स्पष्ट शब्दात सांगितले.

देवेंद्रजी म्हणाले, हवा केवळ मोदीजींची
देवेंद्र फडणवीस यांना सी-व्होटर सर्वेक्षणाचा प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, “मी सर्वच सर्व्हेचा सन्मान करतो, पण ए-व्होटर असो, बी व्होटर असो, सी-व्होटर असो, डी-व्होटर असो किंवा झेड-व्होटर असो… हे लक्षात ठेवा, फक्त मोदींची हवा आहे. जनतेनं ठरवून टाकलंय की मोदींनाच व्होट द्यायचे त्यामुळे, आम्ही 40 पार जाणार म्हणजे जाणारच..”


शरद पवार म्हणाजे सर्वेवर जावूच नका
शरद पवार म्हणाले की, सर्व्हेवर अवलंबून राहून कुणी निष्कर्ष काढू नये. सर्व्हे नेहमी येतात व अनेकवेळा ते खरे-खोटे असतात. आताच पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्याचे सर्व्हे वेगळे आकडे सांगत होते. पण प्रत्यक्षात लोकांनी अंतिम निकाल वेगळा दिला.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !