धक्कादायक ! : कच्च्या बांधकामाची भिंत कोसळून सहा कामगार ठार


नवी दिल्ली : कच्चे बांधकाम असलेली भिंत कोसळल्याने सहा कामगारांचा मृत्यू ओढवला आहे. ही धक्कादायक घटना उत्तराखंडच्या रुडकी येथे घडली. मंगलौर तालुक्यातील लहबोली गावात विटभट्टीवरील सकाळी वीटभट्टीवर कामासाठी आलेल्या मजुरांच्या अंगावर ही भींत कोसळून अपघात झाला. या अपघातात सात कामगार गंभीर जखमी झाले.

आमदारांसह पोलिस अधीक्षकांची धाव
अपघातातील जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लक्सर येथील आमदार मोहम्मद शहजाद, पोलीस अधीक्षक यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू करण्यात आले. लहबोली गावात विटभट्टी कारखानदारी आहे. येथे जवळपास 100 पेक्षा अधिक कामगार काम करतात. यावेळी, कच्च्या विटांची भट्टीत भरणी करण्याचं काम सुरू होतं. त्याचवेळी, कच्च्या विटांची भींत कोसळून दुर्घटना घडली.




सहा कामगार जागीच ठार
या दुर्घटनेत मुकुल, साबिर, अंकित, बाबूराम आणि जग्गी यांचे जागेवरच मृत्यू झाला तर आशु, समीरसह 5 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार मोहम्मद शहजाद, एसपी एस.के सिंह, एसडीएम विजयनाथ शुक्लांसह अधिकारी घटनास्थळी पोहोचले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !