भुसावळात मालमत्तांचे चुकीचे कर मूल्यांकन : शुक्रवारी लोणारी हॉलमध्ये सुनावणी


Wrong tax assessment of properties in Bhusawal : Hearing in Lonari Hall on Friday
भुसावळ :
 भुसावळ पालिकेने केलेल्या मालमत्ता पुर्नमुल्यांकनावर तब्बल पाच हजार 140 हरकती प्राप्त झाल्यानंतर या हरकतींबाबत शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी सुनावणी होणार आहे. पालिकेने शहरातील नवीन बांधकाम, जून्या मालमत्ता, भुखंड, सुधारणा आदी मालमत्तांचे मोजमाप करुन पालिकेने कर मागणी पत्रकांचे वितरण केले. वाढीव व चुकीच्या करपध्दतीवर शहरातील पाच हजार 140 हरकती पालिकेकडे दिल्या होत्या. या हरकतींवर शुक्रवारी लोणारी हॉलमध्ये सुनावणी होत आहे.

सुनावणीस हजर नसलेल्यांना करवाढ गृहीत धरणार
सुनावणी वेळी करमूल्य निर्धारण अधिकारी भुसावळ नगरपरिषद तसेच नगररचनाकार जळगाव यांच्या समक्ष कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. पालिकेने या सुनावणीनंतर अंतीम करनिर्धारण करण्याचे नियोजन केले आहे. हरकतीनंतर सबंधीतांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यासोबतच जागेचे मोजमापही होणार आहे. हरकत दाखल करणार्‍यांनी उपस्थिती न दिल्यास त्यांचे हरकतींबाबत म्हणणे नाही, असे गृहित धरून एकतर्फी निर्णय दिला जाणार आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !