अकलुद-दुसखेडा रस्त्याची महिन्याभरात दुरूस्ती : आश्वासनानंतर यावलला आंदोलन मागे
Repair of Aklud-Duskheda road within a month: After the promise, the protest was called off यावल : चोपडा रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम उपविभागासमोर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे न ठिय्या आंदोलन करण्यात आले.
ठिय्या आंदोलनाने उडाली खळबळ
यावल तालुक्यातील अकलुद-दुसखेडा दरम्यान असलेला रस्त्यासाठी निधी उपलब्ध होऊनही गेल्या तीन वर्षांपासून रस्ता अपूर्णावस्थेत पडून आहे. या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे याकरीता राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यासोबत सरपंच व ग्रामस्थ ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. महिनाभरात हा रस्ता तयार करण्यात येईल, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावल तालुक्यातील अकलुद ते दुसखेडा या मार्गावरील रस्त्याच्या कामासाठी जवळपास दिड कोटींचा निधी मंजुर झाले आहे. असे असतांना संबधित सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या वेळ काढूपणामुळे मागील तीन वर्षांपासून रस्त्याचे काम हे अपूर्णावस्थेत पडून आहे. यामुळे रस्त्याशी जोडलेल्या जवळपास 22 गावांच्या नागरीकांना नादुरूस्त रस्त्याअभावी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे व अनेक अपघात या रस्त्यावर घडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली दुसखेडा व परिसरातील विविध गावांच्या सरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत यावलच्या सार्वजनिक बांधकाम उप विभागाच्या कार्यालया समोर बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.


सा.बां.विभागाने दिले लेखी आश्वासन
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जे. एस. तडवी व बांधकाम अभियंता अजीत निंबाळकर यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांना एक महिन्याच्या आत संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे लिखित स्वरूपात आश्वासन देण्यात आले व आंदोलन मागे घेण्यात आले.
यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात राष्ट्रवादीचे लोकसभाक्षेत्र प्रमुख अतुल पाटील सह तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, नगर परीषदेचे माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, माजी उपनगराध्यक्ष शेख असलम शेख नबी, जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, आदिवासी विभागाचे एम. बी. तडवी, वसंत पाटील, मोहसीन खान, आबीद कच्छी, माजी नगरसेवक हाजी अकबर खाटीक, बापुू जासुद, समाधान पाटील, अन्वर खाटिक, कामराज घारू, ललित पाटील, हाजी युसुफ शेख, कासवा गावांचे सरपंच राहुल इंगळे, सदस्य श्रीराम सपकाळे, दुसखेडा ग्रामपंचायत उपसरपंच विवेक सोनवणे, ग्राम पंचायत महेन्द्र बारहे, याकुब तडवी, विनोद पाटील यांच्यासह विविध ग्रामपंचायत सदस्य सह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.





