भुसावळात नाहाटा चौफुलीवर उद्यापासून लिकेज दुरुस्ती : पाच दिवस पाणीपुरवठा बंद
सर्विस रोडवर होणार खोदकाम : लिकेजमुळे हजारो लिटर पाण्याचा होतोय अपव्यय
Leakage repair on Nahata Chauphuli in Bhusawal from tomorrow : Water supply shut for five days भुसावळ शहरातील नाहाटा महाविद्यालय चौफुलीजवळ लिकेज पाईप लाईनी दुरुस्ती शुक्रवारपासून केली जाणार आहे. महामार्ग प्राधिकरणाने आता सर्विस रोड खोदकामाला परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून कामाला सुरूवात होईल, अशी माहिती पाणीपुरवठा अभियंता दीपक चौधरी यांनी दिली. या कामामुळे दक्षिण भागात सुमारे पाच दिवस पाणीपुरवठा प्रभावीत राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, गळतीचे प्रमाण वाढल्याने 19 लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ भरण्यासाठी पाच तासांऐवजी 9 ते 10 तासांचा वेळ लागत आहे. परीणामी दक्षिण भागातील रोटेशनवर एक दिवसांचा परिणाम झाला आहे.
परवानी नाकारल्याने लांबले काम
पाईप लाईन लिकेज दुरुस्तीसाठी अंडरपासमधून पाईपलाइन टाकणे सहज शक्य होते. पालिकेने तसे नियोजनही केले होते मात्र मंगळवारी अधिकार्यांच्या झालेल्या चर्चेत प्राधिकरणाने ही परवानगी नाकारली आहे. महामार्ग अंडरपासमधून पाईप लाईन बायपास जोडणी ऐवजी प्राधिकरणाने सर्व्हिसरोड फोडण्यास परवानगी दिली असलीतरी यापूर्वी परवानगी नाकारण्यात आली होती. निव्वळ वेळ वाया घालवला जात असल्याने गळती दुरुस्तीचे काम लांबत आहे.


शुक्रवारपासून होणार दुरुस्ती पाच दिवस पाणीपुरवठा बंद
पाणीपुरवठा अभियंता दीपक चौधरी यांच्या माहितीनुसार, शुक्रवारपासून कामाला सुरूवात केली जाईल. बसस्थानकाच्या नियोजित जागेवरून पूर्ण पाईप लाईन काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व्हिसरोडच्या खालून महामार्गाच्या खालून गेलेल्या पाईप लाईनला नेमकी गळती कोठे? याची माहिती पालिकेकडे नसल्याने के्रनचा वापर करून पाईप लाईन बाहेर काढण्यात येईल, लोखंडी पाईप लाईनची वेल्डिंग निघाल्याचा अंदाज आहे. सर्व्हिसरोडच्या पाच ते सात मिटर अंतरात ही गळती असेल तर खोदकाम करुन दुरुस्ती करता येईल. पाईप काढण्याची वेळ आली तर दुरुस्तीसाठी किमान पाच ते सात दिवस लागतील व त्यामुळे नाहाटा महाविद्यालय परीसरात पाणीपुरवठा ठप्प होईल, असेही पाणीपुरवठा अभियंता दीपक चौधरी म्हणाले..





